Nimisha Priya Fashi Postponed : निमिषा प्रिया या भारतीय नर्सची फाशीला तूर्ता स्थगिती.

लेखक | लोकहित मराठी टीम | 15 जुलै 2025

दिल्ली : भारताची केरळ इथली निमिशा प्रिया हिची फाशी उद्या होणार होती,परंतु सुदैवाने या फाशीला तूर्तास तरी स्थगिती मिळालेले आहे.

2017 पासून यमनच्या तुरुंगात असलेली भारतातील केरळची नर्स निमिषा प्रिया हिला 16 जुलै म्हणजे उद्या फाशी देण्यात येणार होती, पण आता तिच्या कुटुंबाच्या आणि भारत सरकारच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. यमन सरकारने तिची फाशी आता तूर्तास थांबवली आहे.

हा निर्णय मानवी हक्क, धार्मिक समजूती, आणि राजनैतिक दबावाचा परिणाम असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.

कोण आहे ही निमिषा प्रिया?

निमिषा प्रिया या भारतातील केरळ राज्यातल्या पलक्कड या गावच्या आहेत. त्या नर्स म्हणून गेले बऱ्याच वर्षापासून यमन मध्ये काम करत होत्या.

2017 साली निमिषा यांचे व्यवसाय पार्टनर असणारे तलाल मेहदी याने निमिशा प्रिया यांचा पासपोर्ट जप्त करून त्यांच्यासोबत शारीरिक व मानसिक अत्याचार केले.

त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि पासपोर्ट परत मिळवण्यासाठी, निमिशा यांचा व्यावसायिक पार्टनर यमनी उद्योगपती “तलाल अब्दो मेहदी” याला निमिशाने बेशुद्ध होण्याचं औषध दिलं होतं, परंतु औषधाचा डोस जास्त झाल्याने तलाल अब्दो महेदीचा जागीच मृत्यू झाला होता.

त्यानंतर घाबरलेल्या निमिशाने तिच्या आणखी काही साथीदाराच्या मदतीने त्या तलाल अब्दोम महंदी याच्या शरीराची विल्हेवाट लावली होती. त्यानंतर निमिशा प्रियाला यमन च्या स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर येमन च्या सर्वोच्च न्यायालयाने देखील ही फाशीची शिक्षा पुढे कंटीन्यू ठेवली.

निमिषा प्रियाची फाशी कशी पुढे ढकलली.

MEA ( MINISTRY OF EXTERNAL AFFAIRS )
मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्णल अफेअर्सने सातत्याने या प्रकरणांमध्ये यमन सरकारशी चर्चा सुरू ठेवली आहे.

सोमवारी सुप्रीम कोर्टाने देखील भारत सरकारला या प्रकरणांमध्ये गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश दिले होते.nimisha priya

कही धार्मिक नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ब्लड मनीच्या माध्यमातून देखील मेहंदीच्या कुटुंबाशी चर्चासत्र सुरूच ठेवलं होतं.

ब्लड मनी म्हणजे काय?

यमनच्या इस्लामिक कायद्यानुसार पीडित व्यक्तीने जर रक्तधन स्वीकारलं तर आरोपीला होणारी शिक्षा ही माफ केली जाऊ शकते.

निमिषा प्रिया यांच्या केस मध्ये तलाल अब्दो मेहदी च्या कुटुंबाला 8.50 कोटी रुपयांचं रक्तधन देण्याची तयारी निमिषाच्या कुटुंबाने दाखवली होती. त्यावर तलाल अब्दो मेहदी याचं कुटुंब विचार करत आहे.

फाशीची स्थगिती तात्पुरती! पण पुढे काय?

यमन सरकारने 16 जुलैला देण्यात येणारी फाशी ही स्थगिती केली असली तरी, या केसचे पुढे काय होणार किंवा निमिषाला फाशी कधी दिली जाणार यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.

दरम्यान भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात कायदेशीर आणि मानवी आधारावर व कुटनितीच्या माध्यमातून यमन सरकारशी माफी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

निमिषाच्या बारा वर्षीय मुलीने फोडला हंबरडा

निमिषाची बारा वर्षाची मुलगी भारतात तिच्या आजीकडे आहे.
ती सतत तिच्या आईला वाचवण्यासाठी मदतीची याचना करत आहे.

सोशल मीडियाद्वारे सेव निमिशा प्रिया नावाचा हॅशटॅग वापरून निमिषाला सोडवण्यासाठी प्रत्येक जण भारतातला व्यक्ती प्रयत्न करत आहे.

निमिषा प्रियाची उद्याची फाशी जरी स्थगित झाली असली तरी अजूनही लढाई बरीच दूर आहे. निमिषा ही फक्त एक आरोपी नसून ती एक स्त्री देखील आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यामध्ये आता जास्त सक्रिय झाले आहेत.

निमिषाचा जीव वाचू शकतो का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की सांगा आणि निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी सेवनिमीशा प्रिया हा हॅशटॅग वापरा.