MNS Avinash Jadhav Arrest : सगळ्यात मोठी बातमी : पहाटे तीन च्या दरम्यानं शेकडो पोलीस फाट्यासह अविनाश जाधव यांना राहत्या घरून अटक
मनसेचे आक्रमक नेते आणि राज ठाकरे यांचे विश्वासू अविनाश जाधव यांना मीरा भाईंदर मधील मोर्चा अगोदरच पहाटे तीन वाजता , शेकडो पोलीस फाट्यासह अविनाश जाधव यांच्या घरून अटक करण्यात आली.
अविनाश जाधव यांच्या अटकेमुळे मीरा-भाईंदर परिसरामध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे.परप्रांतीय व्यापाऱ्यांनी पाठीमागे केलेल्या एका शक्ती प्रदर्शनाला प्रतिउत्तर म्हणून मीरा भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समिती यांच्याकडून आज मोर्चा काढण्यात येणार आहे मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रती बंधत्मक कारवाईला सुरुवात केली होती, त्यानुसार पोलिसांनी सोमवारपासूनच मनसेच्या आणि ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली
मात्र मंगळवारी पहाटे तीन वाजता मीरा-भाईंदर पोलिसांनी त्यापेक्षा मोठी कारवाई करत मनसेचे ठाणे पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
अविनाश जाधव यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती मात्र तरीही अविनाश जाधव हे मोर्चाला जाण्यावरती ठाम होते, जाधव यांनी मराठी बांधवांना या मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे देखील आव्हान केले होते. त्यामुळे पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता शेकडो पोलीस फाट्यासह अविनाश जाधव यांचे निवासस्थान गाठले आणि त्यांना पहाटेच ताब्यात घेतले, आता सध्या अविनाश जाधव यांना मीरा भाईंदर येथील काशिमिरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे.
मराठी एकीकरण समिती मनसे आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता आता अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर पोलिसांकडून मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वसई आणि विरार मधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे त्यामुळे मीरा भाईंदर मध्ये आज मोर्चावर हो होणार की नाही याचं सावट निर्माण झाला आहे, हा मोर्चा सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल पासून सुरु होणार असून मिरा रोड स्टेशन परिसरामध्ये या मोर्चाची सांगता होणार आहे.
देवेंद्र फडणवीस आणि मनसेला डिवसला :
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र मध्ये हिंदी भाषा सक्तीचा वाद हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यामध्येच भर म्हणून मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मीरा-भाईंदर येथील एका मिठाई व्यापाऱ्याला उर्मट भाषा बोलली म्हणून कानाखाली मारली होती त्यानंतर हिंदी आणि मराठी वाद हा वाढत चालला आहे, त्याच घटनेनंतर मिरा रोड येथील परप्रांतीय व्यापाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी एक मोर्चा काढला होता, आता त्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठी एकीकरण समिती आणि मनसे शिवसेना उबाठा गट यांच्याकडून एका मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, नेहमीप्रमाणे या मोर्चाची सुरुवात होण्याअगोदरच मनसेच्या काही मोठ्या नेत्यांना या देवेंद्र फडणीस यांच्या पोलिसांनी कायदेशीर नोटीस देखील बजावल्या, एवढ्यावर न थांबता मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना पहाटे तीन वाजताच पोलिसांनी त्यांच्या राहते घरून अटक करण्यात आली, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक होऊ शकते
या नेत्यांना पोलिसांनी नोटीस बजावली :
मराठी एकीकरण समिती अविनाश जाधव आणि वसई विरार मधील मनसेच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना यांच्या देखील मोठ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली होती, त्याचबरोबर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील, त्याचबरोबर मनसेच्या इतर नेत्यांनाही मीरा-भाईंदर पोलिसांनी यापूर्वी नोटीस बजावली होती, परंतु आज पहाटे तीन वाजताच मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरून अटक करत मोर्चाला जाण्यास प्रतिबंधित करण्यात आला आहे.
यामुळे मीरा भाईंदर मधील मराठी एकीकरण समिती आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रति मोर्चा निघणार होता त्यामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
MNS morcha in Mira Bhayandar :
पोलिसांनी मीरा भाईंदर मधील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली होती मात्र “मराठी आमची आई आहे आणि आईसाठी कोणताही गुन्हा घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, हा मोर्चा नियोजित वेळेवर आणि ठिकाणी निघणारच असा निर्धार अविनाश जाधव यांनी व्यक्त केला होता, पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती मराठी जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा आणली जात आहे पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत,असं आरोप अविनाश जाधव यांनी यापूर्वीच केला होता. आज अविनाश जाधव यांना पहाटे तीनच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरातून मीरा-भाईंदर पोलिसांनी अटक केली.
संविधानात्मक मार्गाने मोर्चा ही काढू शकत नाही का ?
महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर संविधानिक मार्गाने मोर्चा काढायचा असेल तर त्यालाही पोलिसांकडून परवानगी मिळत नाही अशाच प्रकारची धक्कादायक माहिती समोर येत आहे, मीरा भाईंदर येथे मराठी आणि हिंदी वाद जो सुरू झाला त्यानंतर मीरा भाईंदर येथील व्यापाऱ्यांकडून मराठी लोकांच्या विरोधामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं, आणि याच गोष्टीला प्रत्युत्तर म्हणून मराठी एकीकरण समिती, मनसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांकडून आज या मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं परंतु हिंदी प्रेमी आणि मराठी द्वेषी असणारं सरकार यांनी बरोबर या मोर्चाला विरोध दर्शवला आणि या सरकारच्या पोलिसांनी या मोर्चा काढणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्याची संकेत दिले, त्यामुळे संदीप देशपांडे, राजू पाटील,मराठी एकीकरण समिती, अविनाश जाधव आणि वसई विरार मधील मनसेचे मोठे कार्यकर्ते यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली.
मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनातर पहाटे तीन वाजता त्यांच्या घरातूनच शेकडो पोलिसांच्या फौजेने अविनाश जाधव यांचा अटक करण्यात आली, आता मनसेकडून अधिकृत कोणती भूमिका येते हे बघणं महत्त्वाचं राहील.
मनसेच्या गुंडांची दादागिरी सहन करून घेणार नाही, फडणवीसांनी यापूर्वीच दिली होती धमकी :
महाराष्ट्र मध्ये हिंदी मराठी जो काही वाद सुरू आहे त्यावर ती परप्रांतीय व्यापारी चुकीचं बोलल्यामुळे मराठी आणि मनसेचे कार्यकर्ते यांनी त्याच्या कानाखाली लावली होती त्यानंतर हिंदी आणि मराठी भाषेचा वाद हा उफाळून आला यामध्येच हिंदी प्रेमी आणि हिंदी भाषा सक्ती करण्याचे स्वप्न घेऊन जगत असलेले या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांना गुंडे म्हणत त्यांना एक धमकीवजा इशारा दिला होता त्यांनी सांगितलं होतं भाषा सक्तीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही कायदा हातात घेणाऱ्यांवर आम्ही खडक कारवाई करू.