Chatrapati Sambhaji Nagar Fraud: चक्क विश्वास नांगरे पाटलांचा चेहरा वापरून AI माध्यमातून 78 लाखांना लुटलं!
छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा AI माध्यमातून बदलला आणि एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 78 लाख रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर येथे घडले आहे.
गुन्हेगाराने आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचा AI द्वारे चेहरा तयार करून छत्रपती संभाजी नगर मधल्या शहरात दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात तब्बल वीस लाख रुपये जमा झाल्याचा बनाव रचला आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी सहा दिवसांमध्ये तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांना लुटलं.
आरोप हे अतिशय चतुर होते त्यांनी IPS विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखा दिसणारा एक चेहरा AI माध्यमातून तयार केला आणि व्हिडिओ कॉल द्वारे एका वृद्धाला विश्वास ठेवण्यास भाग पाडले की मी आयपीएस विश्वास नांगरे पाटीलच आहे.
77 वर्षीय तक्रारदार हे एका विभागीय आयुक्त सेवानिवृत्त झाले आहेत. 2जुलै 2025 रोजी त्यांना पोलिसांचा गणवेश घातलेल्या व्यक्तीने एक व्हिडिओ कॉल केला आणि मी संजय पिसे असे नाव सांगून तो विश्वास नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याची माहिती देण्यात आली. तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात तब्बल दोन कोटी रुपयांचा बेहिशेबी व्यवहार झाला आहे, त्याचा संबंध थेट दहशतवादी अब्दुल सलाम यांच्या सोबत निष्पन्न झाला आहे , अशी माहिती त्या सायबर आरोपींनी सेवानिवृत्त अधिकाऱ्याला दिली.
सुरुवातीला या सायबर आरोपींनी सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सांगितलं की 20 लाख रुपये तुमच्या खात्यात आले आहेत आणि NIA कडून गुन्हा दाखल करून अटक देखील तुम्हाला होऊ शकते , अशी थांब सेवानिवृत्त अधिकाऱ्याला मारली यानंतर तक्रारदार म्हणजे सेवानिवृत्त अधिकारी घाबरून गेले , कारण गुन्हेगारांनी थेट विश्वास नांगरे पाटील यांचा सहाय्यक असल्याचे सांगितल्यामुळे तक्रारदार जास्त घाबरले.
चतुर सायबर आरोपींनी एवढ्यावरच न थांबता तक्रारदार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही थेट आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याशी थेट सल्लामसलत या विषयावरती करू शकता असं देखील माहिती दिली.
एवढेच नाही तर डिजिटल अरेस्टची बाब राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने कोणालाही याबाबत सांगितलं तर कुटुंबाला अख्या अटक करून तुमची सगळी संपत्ती जप्त करण्यात येईल, असा गंभीर इशारा वजा धमकी देण्यात आली.
यानंतर तक्रारदाराने त्यांच्यासह पत्नीच्या नावे असलेले 78 लाख 69 हजार रुपये 2ते 7 जुलै पर्यंत या सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या तीन बँक खात्यांवर पाठवले, चौकशीनंतर ही रक्कम परत देण्यात येईल अशी थाप देखील गुन्हेगारांनी मारली होती.
सायबर गुन्हेगारांनी अशी ही केलेली खेळी तक्रारदाराचा विश्वास बसण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी आयपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांच्या विभागातून बोलत असल्याचं आणि त्यांचे सहाय्यक बोलत असल्याचे सांगितलं होतं.
4 जुलै रोजी व्हिडिओ कॉल वर नांगरे पाटील यांच्या सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीने संवाद देखील साधला होता . मराठी असल्याचे सांगून विश्वासात देखील त्यांना घेतलं होतं, या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये आता एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यामध्ये पोलिसांकडून या सायबर गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.
विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेऊन आतापर्यंत राज्यात किती जणांना फसवलं?
* रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकाऱ्याला 2025 जून मध्ये विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करत त्यांच्याकडे असलेले शेअर्स विकून तब्बल 60 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता.
* याच महिन्यात जून 2025 मध्येच कोल्हापूर मधल्या एका तीन सेवानिवृत्त प्राध्यापिकेकडून विश्वास नांगरे पाटील यांच्याच नावाने तीन कोटी रुपये उकळण्यात आले होते.
* यात जून महिन्यात विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने व्हिडिओ कॉल करून बीडमध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकेकडून आठ लाख रुपये उकळण्यात आले होते.
* ऑगस्ट 2024 मध्ये देखील अशाच पद्धतीने एका ज्येष्ठ महिलेकडून विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा दुरुपयोग करत 23 लाख रुपये उकळण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर येथे घडलेली ही घटना आणि उर्वरित जून आणि ऑगस्ट महिन्यामध्ये घडलेल्या घटना या सर्व घटनेमध्ये आरोपी हे एकच आहेत का या दृष्टिकोनातून देखील तपास केला जातोय.