लोकहित मराठी

Today Gold Price : [ Marathi ] आजचा सोन्याचा भाव : सोन्याच्या दारात मोठी घसरण

Today Gold Price : [ Marathi ] आजचा सोन्याचा भाव : सोन्याच्या दारात मोठी घसरण,

Today Gold Rate [ Marathi ] : आजचा सोन्याचा भाव, गेल्या काही दिवसांमध्ये सराफ बाजारामध्ये सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत, यामुळे सर्वसामान्य माणसांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागते ,अशातच आता सोन्याच्या दरामधली मोठी घसरण पाहायला मिळालं आहे , तर चांदीच्या दरातही मोठा बदल झाल्याचा  पाहायला मिळते, चला तर मग जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव .

 

‘बुलेटीन मार्केट’  या प्रसिद्ध वेबसाईट नुसार, आज 7 जुलै 2025 रोजी देशामध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा जवळपास 96 हजार 840 रुपये आणि 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 88,770 रुपये , तर एक किलो चांदीचा दर हा 1 लाख 8390 इतका झालेला आहे. याशिवाय  उत्पादन कर राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलत असतात,  याबरोबरच तुमच्या शहरात नेमके कोणते दर आहेत ते आपण समजून घेऊय.

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव :
शहरांपैकी जर बघायचं झालं तर

  मुंबईमध्ये :  22 कॅरेट सोन्याचा दर हा 88,605 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर  96 हजार 660 रुपये प्रति दहा ग्राम आहे

     पुणे :  प्रति 10  ग्राम  22 कॅरेट सोन्याचा दर 88,605 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर हा 96 हजार 660 रुपये आहे

नागपूर :  प्रति 10 ग्राम सोन्याचा 22 कॅरेट सोन्याचा दर 88605 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 96 हजार 660 रुपये इतका आहे

नाशिक : प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 88,605 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 96 हजार 660 रुपये आहे

( महत्वाचं : वरील सोन्याचे दर हे सुचक आहेत आणि त्यात जीएसटी टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरी संपर्क साधा )

22 कॅरेट आणि 24 कॅरेट मध्ये नक्की काय फरक असतो?

आपण नेहमी सोन खरेदी करताना सरापांकडून एक प्रश्न नेहमी विचारला जातो तुम्हाला 22 कॅरेट खरेदी करायचा आहे की 24 कॅरेट?  पण कधी कधी तुम्हाला हे माहीत नसल्यामुळे तुम्ही गोंधळात पडू शकता की नक्की 22 कॅरेट आणि 24 कॅरेट मध्ये इतका काय फरक आहे, आणि तुम्ही सोनं विकत घेत असाल तर तुम्हाला हेही माहिती असणं फार गरजेच आहे की 22 कॅरेटचं सोनं आणि 24 कॅरेटचा सोन्या पैकी शुद्ध सोनं कोणता आहे,?

24 कॅरेट सोनं हे 99.99% शुद्ध आहे

आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असत

22 कॅरेट सोन्यात तांबे चांदी जस्ट यांसारख्या 9% इतर धातूंचं मिश्रण करून दागिने तयार केले जातात

24 कॅरेट सोनं शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत,  त्यामुळे बहुतेक दुकानदार तुम्हाला 22 कॅरेट हेच सोन विकतात.

Exit mobile version