Saina Nehwal And Parupalli Kashyap Divorce : सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप यांचा घटस्फोट ; सात वर्षांचं नातं संपलं!

लेखक | लोकहित मराठी टीम | 15 जुलै 2025

भारतीय क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील एक प्रतिष्ठित आणि प्रेरणादायी जोडपं “सायना नेहवाल” आणि त्यांचे पती “पारूपल्ली कश्यप” यांनी अखेर आपल्या वैवाहिक नात्याचा शेवट केल्याची घोषणा केली आहे. जवळपास सात वर्षांच्या सहजीवनानंतर दोघांनी परस्पर सहमतीने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

सायना नेहवाल हिने या संदर्भातली माहिती स्वतः इंस्टाग्राम वर एक पोस्ट करत दिली आहे तिने लिहिलं की,

“हा निर्णय आम्ही शांततेने, परिपक्वतेने आणि वैयक्तिक विकासासाठी घेत आहे. काही वेळा प्रेम असूनही माणसं वेगळे होतात; कारण आत्मशांती आणि मन स्वास्थ्य जास्त महत्त्वाचं वाटतं.

सायना नेहवाल आणि पारूपल्ली हे कसे भेटले होते?

सायना आणि कश्यप यांची ओळख “गोपीचंद अकॅडमी” मध्ये झाली होती. दोघेही त्याच ठिकाणी सराव करत असताना एकमेकांची ओळख मैत्रीत झाली, आणि मग पुढे प्रेमात परिवर्तन झाल.
त्यांनी डिसेंबर 2018 मध्ये लग्न केलं आणि तेव्हापासून ते एक आदर्श बॅडमिंटन जोडपं म्हणून देखील ओळखलं जात होतं.

घटस्फोट का झाला? कारण काय?

यासंदर्भात सायना नेहवाल ने घटस्फोटाचं नेमकं कारण जरी स्पष्ट केलं नसलं तरी पाठीमागे तिने एक मुलाखत दिली होती, आणि त्या मुलाखतीमध्ये म्हणलं होतं.

“आम्ही बॅडमिंटनमध्ये एकत्र आहोत पण इतर अनेक गोष्टींमध्ये पूर्णपणे वेगळे आहोत’. तिच्या या वक्तव्यावरून त्या दोघांच्या नात्यांमध्ये साम्य नसल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे दोघांनी सन्मानपूर्वक वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

दोघांचं देशासाठी कार्य :

दोघांची स्वतंत्र पण तेजस्वी कारकीर्द आहे,
साईना नेहवाल ही भारताची माजी “वर्ल्ड नंबर वन” खेळाडू आहे, तसेच “ऑलिंपिक ब्राँझ मेडल” देखील मिळवला आहे. आणि अर्जुन पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारकडून सन्मानित करण्यात आला आहे.

पारू पल्ली कश्यप 2012 मध्ये ऑलिंपिक कॉर्टर फायनल लिस्ट मध्ये देखील त्यांनी भाग घेतला होता. 2014 मध्ये “कॉमनवेल्थ गेम्स” मध्ये भारतासाठी सुवर्णपदक देखील त्यांनी जिंकून आणलं होतं आणि या दोन्ही खेळाडूंनी भारतासाठी बॅडमिंटन खेळाला जागतिक स्तरावर स्थान मोठं निर्माण करून दिलं आहे.

घटस्फोटाच्या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी

सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटावर त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आलं. साईनाने instagram वरती पोस्ट केल्यानंतर काही तासातच सोशल मीडिया वरती चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. यामध्ये अनेक चाहत्यांनी या दोघांना घटस्फोटाचं समर्थन केलं तर काहींनी शुभेच्छा देखील दिल्या, तर काही लोकांनी त्यांच्या वैयक्तिक खाजगी आयुष्याचा आदर ठेवण्याची देखील विनंती केली.

2025 हे वर्ष अनेक कुटुंब तोडणार ठरलं!

2025 या वर्षांमध्ये अनेक खेळाडूंच्या नात्यांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं, तसेच अनेक जणांनी यातून वेगळे होण्याचा देखील निर्णय घेतले.

सायना नेहवाल आणि पारू पल्ली यांचा घटस्फोट ही एकटी घटना नाही,
याच वर्षांमध्ये
सानिया मिर्झा – शोएब मलिक,
युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा
यांसारख्या अनेक खेळाडूंनी आपल्या वैवाहिक नात्यातून माघार घेतली. हे चित्र क्रीडा क्षेत्रातील तणाव, वेळेचा अभाव आणि वैयक्तिक आयुष्याची गुंतागुंत यांचे दर्शन घडवत.

या सगळ्या प्रकरणांमध्ये तुम्हाला काय वाटतं प्रेम, नातं समजूत याचं संतुलन राखणं किती कठीण आहे, तुमचं म्हणणं आणि तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की शेअर करा आणि अशाच संवेदनशील दर्जेदार आणि खेळ विषयक बातम्या वाचण्यासाठी  www.lokhitmarathi.com ला अपडेट राहा.