Rohit Pawar Attack on Praveen Gaikwad Sambhaji Brigade : संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला कोणी केला

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती सोलापूर येथे शाहीफेक करण्यात आली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. प्रवीण गायकवाड यांनी या हल्ल्यासाठी थेट सरकारला जबाबदार धरले असून हा त्यांच्या हप्तेचा कट असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. या घटनेमुळे पुरोगामी विचारधारेचे कार्यकर्ते असुरक्षित असल्याची भावना त्यांनी या वेळेला व्यक्त केली. कधी कधी पक्ष फोडले जातात पक्षांतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो, मग त्यांच्यासारखी कुठलीही गोष्ट करता आली नाही. आम्ही एक सत्य विचारसरणीचं काम करतो आमचा विचार हा राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे. या देशात मानवता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडचे काम सुरू आहे. आणि तेच सुरू राहणार पण दुर्दैवाने अशा सामाजिक संघटनाबाबत काही गैरसमज पसरले जातात आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतात.

मि “या हल्ल्याचा निषेध करणार नाही पण एक गोष्ट निश्चित सांगतो ही शेवटाची सुरुवात आहे”

अमोल मिटकरी काय म्हणाले :

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी जो हल्ला केला, त्या हल्ल्याचा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून निषेध व्यक्त करतो प्रशांत कोरटकर वेळी हे हल्लेखोर कुठे होते असा सवाल अमोल मिटकरी यांनी यावेळी उपस्थित केला.

रोहित पवार काय म्हणाले :

प्रवीण गायकवाड यांच्यावरील झालेल्या भ्याड कृत्या मागील मास्टरमाइंड चा पोलिसांनी शोध घ्यावा – रोहित पवार

बहुजन समाजात अनेक उद्योगपती घडवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाही फेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध.
शिव फुले शाहू आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्याचा खूप मोठं कार्य प्रवीण दादा गायकवाड यांच्या हातून होत आहे. अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांना उघड पाडण्याचं काम केलं, म्हणून तर समाजकंटक यांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं तर नाही ना? याचाही तपास झाला पाहिजे. असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
तसंच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे, हे उघड आहे त्यामुळे या भ्याड हल्ल्या मागील मास्टरमाईंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा. आम्ही सर्वजण प्रवीण दादा गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं रोहित पवार म्हणाले.

Dr शिवरत्न शेटे यांनी केला प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार :

सोलापूर येथील अक्कलकोट मध्ये काळ फासण्याची घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आहे.
शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी हा सत्कार केला आहे झालेल्या घटने संदर्भात विषयावर आत्ताच बोलणार नाही योग्यवेळी प्रत्युत्तर दिल्यानंतर आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर मांडू असं शिवरत्न शेटे म्हणाले, दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे डोळ्याची तपासणी करण्यासाठी डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हॉस्पिलला ते आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे काय म्हणाले :

ज्यांना विचारांचा सामना विचारांशी करता येत नाही ते असे विकृत कृत्य करतात

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या भ्याड शाहीफेक हल्ल्याचा तीव्र निषेध.
प्रवीण दादांनी शिव,फुले,शाहू, आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्यासाठी आणि बहुजन समाजात अनेक उद्योगपती घडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. त्यांच्या अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांचे मुखवटे उघडे पाडले आहेत. आणि हीच खरी चीड आहे, ह्या विकृतीना आजवर कोरटकर, छिंदम,कोशारी, सोलापूरकर, दानवे अशा अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्याविरुद्ध लिखाण केले. आणि त्यावर गप्प बसणारे हे अशा हल्ल्यांना खतपाणी घालत आहेत. हे हल्लेखोर कोणी शिवप्रेमी किंवा शिवभक्त नसून गुंडांची टोळी आहे ज्यांना विचारांचा सामना विचारांशी करता येत नाही. ते असे विकृत कृत्य करतात, या भ्याड हल्ल्यामागे कोण आहे कोणत्या पक्षाशी संबंधित आहे. याचाहि तपास झाला पाहिजे. मास्टर माईंडचा परदाफाश होणे आवश्यक असल्यास मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी व्यक्त केले. पुरोगामी विचारांचा आवाज दाबण्यासाठी सरकार जनसुरक्षा कायदा वापरतं आणि आता विचारवंतांवर हल्ले होत आहे हे त्याच साखळीतील पाऊल आहे, सरकारने तात्काळ या विकृतींचा या गुंडांचा व त्यांच्या मागे असणाऱ्या सूत्रधार यांचा बंदोबस्त करावा. प्रवीण दादा आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत असं विकास म्हणाले.