Navi Mumbai Marathi Bhasha College Boy Marhan : ए… मराठीत बोलू नकोस! नवी मुंबईत महाविद्यालयातील युवकाला हॉकी स्टिकने रक्तबंबाळ करत मारहाण
लेखक | लोकहीत मराठी टीम | 24 जुलै 2025
नवी मुंबई : राज्यात मराठी अमराठी वाद हा चिगळत चालल्याचा सध्याचे चित्र आहे. नुकताच कल्याण डोंबिवली येथील एका मराठी हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्टला झालेली मारहाण ताजी असताना, महाराष्ट्र मध्ये हिंदी मराठी वाद सुरू असताना नवी मुंबईच्या ऐरोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. यामुळे मराठी मराठी वाद हा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील एका महाविद्यालयात मराठीत बोलल्यामुळे एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला काही तरुणाने हॉकी स्टिकने मारहाण करत रक्तबंबाळ केला आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवारी 22 जुलै सकाळच्या सुमारास नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका महाविद्यालयाबाहेर एका विद्यार्थ्याला तो मराठीत बोलत असल्यामुळे त्या ठिकाणी अमराठी तीन ते चार जणांनी मिळून मराठी तरुणाला बेदम मारहाण केली.
आरोपी फैजान नाईक यांनी त्याच्या इतर तीन साथीदारांसोबत मिळून केलेल्या मारहाणीत पीडित युवकाला तोंडावर पोटावर जबर मार लागला.
ऐरोलीत राहत असणाऱ्या एका गावातील रहिवाशी असलेल्या पिडीत तरुणाने सांगितले की, मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास महाविद्यालयाच्या बाहेर आरोपी फैजान त्याच्या साथीदारांसोबत उभा होता काही कारणामुळे आरोपीची आणि पिढीत युवकाची शाब्दिक चकमक उडाली, पीडित युवक यावेळी मराठीत बोलत होता, आरोपी फैजान संतापून त्याला “तू मराठीत बोलू नकोस” असे म्हणाला आणि बघता बघता ही शाब्दिक चकमक हाणामारी मध्ये झाली. आरोपीला साथ देण्यासाठी त्याच्या साथीदाराने ही लाथा बुक्क्यांनी मारलं, दरम्यान फैजान हॉकी स्टिक घेऊन आला आणि त्या युवकावरती रक्तबंबाळकर जीवघेणा हल्ला केला.
या घटनेमुळे महाविद्यालयाबाहेर एकच गोंधळ उडाला आजूबाजूला गर्दी झाल्याचे लक्षात येतात आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
पीडित विद्यार्थी जखमी अवस्थेत पडलेला असलेला पाहून काही नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना समजतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले खरे! पण, तोपर्यंत आरोपींनी तिथून पळ काढला.
याप्रकरणी फैजान आणि त्याच्यासाथीदार विरुद्ध गुन्हा दाखल असून पोलीस चारही जणांचा शोध घेत आहेत. या घटनेमागील कारणाचा आता पोलीस तपास करत आहेत.
कल्याण नांदिवली तरुणीचा प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती
कल्याण येथील नांदिवली परिसरामध्ये एका खाजगी क्लिनिकमध्ये मराठी रिसेप्शनिस्टला एका परप्रांतीय गोकुळ झा आणि त्याच्या पूर्ण परिवाराने मारहाण केली. ही बातमी ताजी असतानाच आता या घटनेमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे त्या व्हिडिओमध्ये दिसते की ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली त्या मराठी तरुणीने हा व्हिडिओ यायच्या अगोदर किंवा या व्हिडिओच्या अगोदर त्या गोपाळ झा नावाच्या आरोपीच्या वहिनीवर हात उचलल्याचे पाहायला मिळत आहे, पण एखादी व्यक्ती अचानक असा एखाद्या व्यक्ती वरती का हात उचलेल, या ठिकाणी प्रश्न आहे. त्यासाठी अगोदरचा सीसीटीव्ही फुटेज बघितला असता, या फुटेज मध्ये मराठी तरुणी ही मराठीतून “डॉक्टर आत मध्ये व्यस्त आहेत, तुम्ही थोडा वेळ थांबा” असं मराठीतून सांगत आहे यावेळी गोपाळ झा आणि त्याचे सगळे परिवारातील लोक त्या मुलीला तू मराठीत सांगू नकोस हिंदी मधून बोल अशा पद्धतीची भाषा वापरून दमदाटी करत होते. आणि त्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली त्याच्यानंतर या परप्रांतीय परिवाराने त्या मुलीला आई बहिणी वरून अत्यंत खालच्या दर्जाच्या शिव्या देण्यास सुरुवात केली. त्या मुलीनेही उलट शिव्या देण्यास सुरुवात केली. याचा परिणाम तो परप्रांतीय आरोपी गोपाळ झा हा त्या मुलीवरती धावून गेला आणि त्या मुलीला पहिल्यांदा एक लाथ मारली त्यानंतर वैतागून त्या मुलीने परप्रांतीय गोपाळ यांच्या वहिनीच्या कानाखाली मारली.
आणि त्यानंतर गोपाळ झा याने त्या मुलीला बाहेरून धावत येऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली हा सगळा घटनाक्रम अशा प्रकारे आहे.
काही परप्रांतीय भैय्यांना साथ देणारे मराठी भय्ये त्या मुलीने गोपाळ झा याच्या वहिनीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल करून परप्रांतीय भैय्यांना साथ देत आहेत.
परप्रांतीय यांचा आवाज का वाढला आहे
महाराष्ट्र मध्ये हिंदी भाषा सक्ती ज्या वेळेला राज्य सरकारने केली तेव्हा पासून मराठी आणि हिंदीचा वाद हा पुन्हा चिघळला आहे. यामध्येच मीरा-भाईंदर येथे एका परप्रांतीयाला माजुरडाडापणा केला आणि मराठी भाषेचा अवमान केला म्हणून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्या वादानंतर पूर्ण देशांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेचा वाद चिघळला आहे. या सगळ्या प्रकरणाला परप्रांतीय भैये जितके जबाबदार आहेत तितकेच महाराष्ट्रामध्ये राहून मराठी खाऊन माजलेले हे मराठी भैये ही तितकेच जबाबदार आहेत. मुळात हिंदी भाषा सक्ती हा वादच वेगळा आहे. याला जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन हिंदी भाषिक विरुद्ध मराठी भाषिक हा वाद करून, बिहारमध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचं भांडवल करता यावं यासाठी काही राक्षसी वृत्तीच्या लोकांकडून प्रयत्न केला जात आहे असा संशय देखील आहे.