Mumbai Train Blasts: 11 Acquitted by High Court | मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट: 11 आरोपींची हायकोर्टातून निर्दोष मुक्तता

मुंबई | लोकहित मराठी टीम | 21 जुलै 2025

मुंबई : 11 जुलै 2006 रोजी मुंबईला हादरुण सोडणाऱ्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. मुंबई हायकोर्टाने धक्कादायक निकाल देत मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 पैकी 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
या धक्कादायक निकालाने फक्त तपास यंत्रणा आणि मृतांच्या कुटुंबीयांना धक्का बसला नसून, पूर्ण देशाला हा धक्का बसला आहे. यामुळे प्रकरणाला एक वेगळच वळण देखील लागला आहे. हा निकाल मुंबईच्या दहशतवाद विरोधी लढ्याच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आणि धक्कादायक मानला जात आहे. मुंबई बॉम्ब स्पोट झाला परंतु त्याचे आरोपी निर्दोष न्यायालयाने मुक्त केली, एक तर न्यायालय खोटं बोलत आहे, किंवा तपास यंत्रणेने चुकीच्या आरोपींना पकडला आहे, असा प्रश्न आता जनमानसातून विचारला जाऊ लागला आहे.

काय आहे हे प्रकरण 2006 चा मुंबई बॉम्ब ब्लास्ट

11 जुलै 2006 रोजी मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अवघ्या 11 मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ सात साखळी बॉम्बस्फोट झाले. पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा, माहीम, खार रोड, जोगेश्वरी,भाईंदर,आणि मीरा रोड या स्थानकादरम्यान हे स्पोर्ट झाले.

स्पोर्टानंतर डब्यामध्ये मोठी आग लागली आणि प्रवाशांमध्ये हाहाकार उडाला, या भीषण हल्ल्यात 108 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर 800 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. आणि मुंबईकरांच्या मनात भीतीच वातावरण निर्माण केलं होतं.
पाकिस्तानने पोसलेले लष्करे तोबा या दहशतवादी संघटनेने इंडियन मुजाहिद्दीन च्या मदतीने हा हल्ला घडवल्याचा त्यांच्यावरती आरोप झाला होता.

तपासाची प्रक्रिया आणि विशेष न्यायालयाचा निकाल

या भीषण हल्ल्यानंतर दहशतवाद विरोधी पथक एटीएस आणि इतर तपास यंत्रणांनी वेगाने तपास करत अनेक संशय संशयीतांना अटक केली या प्रकरणाची सुनावणी विशेष मकोका न्यायालयासमोर झाली. 2015 मध्ये विशेष न्यायालयाने 13 आरोपींपैकी बारा जणांना दोषी ठरवले होते. त्यापैकी कमाल अहमद अन्सारी, येथे श्याम, सिद्दिकी फैजल शेख, नवीन प्रसाद, आणि आसिफ खान, यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

तर मोहम्मद साजिद अन्सारी, मुजम्मिल शेख, सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख, तनवीर अहमदासारी, मोहम्मद अन्वर, मोहम्मद अस्लम शेख आणि अब्दुल वाहिद दिन मोहम्मद शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
एका आरोपीची त्यावेळीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

* मुंबई उच्च न्यायालयाचा आजचा धक्कादायक ऐतिहासिक निकाल आहे ज्याने पूर्ण देशाला हादरून सोडला आहे.

मुंबई बॉम्बस्फोट हल्ला प्रकरणी न्यायालयाने बारा पैकी 11 आरोपींची निर्दोष सुटका केल्यामुळे पूर्ण देशांमध्ये खळबळ माजली आहे.

विशेष न्यायालयाच्या निकालानंतर दोषी ठरवलेल्या आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर आज 21 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आपला महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने 12 पैकी 11 आरोपींची निर्दोष मुक्तता करत विशेष न्यायालयाने दिलेल्या फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षा या रद्द केल्या आहेत. एका आरोपीची शिक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे, परंतु त्याबाबत अधिक तपशील अद्याप तरी समोर आलेला नाही.

1993 चे बॉम्बस्फोट ची आठवण

मुंबई शहर यापूर्वीही अशाच मोठ्या दहशतवादी हल्ल्यांना बळी पडला आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई शहर हादरले होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, एअर इंडिया इमारत, शिवसेना भवन, माहीम काजवे, यासह बारा ठिकाणी एका पाठोपाठ एक स्फोट झाले होते. या हल्ल्यात सुमारे 257 लोकांचा बळी गेला होता तर 700 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी झाले होते.

दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांनी हा हल्ला घडवून आणण्याचे मानलं जातं. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता, 2006 च्या ट्रेन बॉम्बस्फोटाने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या मनात 1993 च्या हल्ल्याची आठवण ताजी केली होती.

जनसामान्यांमध्ये आक्रोश

आजच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जर 12 पैकी 11 आरोपी हे निर्दोष असतील तर मग मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट चा दोषी कोण आहे? हा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या 11 आरोपींच्या निर्दोष मुक्ततेनंतर खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित आहे. तपास यंत्रणा या निकालावर काय भूमिका घेतात सर्वोच्च न्यायालयात अपील करतात का? हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरेल! मृतांच्या कुटुंबीयांना आणि पिडीत्यांना या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा होती,परंतु इतक्या वर्षानंतर देखील,अशा प्रकारचा निकाल जर समोर येत असेल तर, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उठला असंच म्हणावे लागेल. या प्रकरणात खरे दोषी कोण आहेत आणि त्यांना शिक्षा कधी मिळणार हा प्रश्न असाच प्रलंबित आहे.

या प्रकरणातील पुढील घडामोडींवर लोकहित मराठी डॉट कॉम लक्ष ठेवून राहील अधिक माहिती आणि सविस्तर विश्लेषणासाठी आमच्या सोबत रहा.