Mumbai News : वडाळा येथे शौचालयास बसलेल्या व्यक्तीचा अठराव्या मजल्यावरून पडून मृत्यू
लेखक | लोकहित मराठी टीम | 15 जुलै 2025
मुंबई मधील वडाळा येथे एका उच्चभ्रू भागात सोसायटी मधील इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या लिफ्ट जवळील खुल्या जागे जवळ शौचालयाला बसलेली एक व्यक्ती
थेट अठराव्या मजल्यावरून खाली कोसळली आणि त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी या अपघाताची प्रथमदर्शनी नोंद केली असून सध्या याबाबत चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार सदर व्यक्तीचं पोट खराब झाल्यामुळे तिला जुलाब झाले होते; आणि अचानक तिच्या पोटात जोरदार कळ आली परंतु घरातल्या टॉयलेटमध्ये अगोदरच कुणीतरी गेल्यामुळे त्याला ति कळ सहन झाली नाही म्हणून लिफ्टच्या बाजूला खुल्या डक च्या बाजूलाच ती व्यक्ती सौचालयास बसली, मात्र पाय घसरल्याने ती खुल्या डक मध्ये पडून थेट इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून खाली कोसळली.
घटनास्थळी पोलीस दाखल होताच सदर घटनेची माहिती घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने सदर व्यक्तीचा मृतदेह तळमजलेच्या डक मधून बाहेर काढण्यात आला.
सविस्तर समजून घ्या नक्की घडलं काय :
संबंधित मृत व्यक्ती तिच्या बहिणीसोबत मातोश्री सदन नावाच्या वडाळामधील एका इमारतीमध्ये राहत होती. काही दिवसांपासून त्या व्यक्तीचे पोट बिघडलं होतं, रविवारी 14 जुलै रोजी घरात असलेल्या टॉयलेटमध्ये कोणीतरी गेलं असताना या महिलेला जोरात कळ आली, घरात एकच टॉयलेट असल्यामुळे त्या महिलेला त्या टॉयलेटला जाता आलं नाही, परंतु पोटातली कळ त्या व्यक्तीला सहन होत नसल्यामुळे इमारतीच्या लिफ्टच्या बाजूला असलेल्या मोकळ्या डक च्या ठिकाणी शौचालयास बसावं लागलं. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी पाय घसरून ती थेट 18 व्या मजल्यावरून खाली कोसळली त्यामध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.