Himachal Pradesh marriage Rule : बायको एक नवरे 2, हिमाचल मधील अजब लग्नाची गजब कहानी! | प्रदीप नेगी, कपिल नेगी, सुनीता चौव्हाण
लेखक | लोकहित मराठी टीम | 20 जुलै 2025
हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेश इथं झालेल्या एका लग्नाने पूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधलं आहे, हिमाचल प्रदेशच्या सिरमोर जिल्ह्यात शिलाई या नावाचे गाव आहे .
त्या गावात अलीकडेच एक अनोखा लग्न पार पडलं, त्यांनी पूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेदल आहे . तिथे एका मुलीसोबत दोन सख्ख्या भावांनी लग्न केला आहे आणि ही तिथली परंपरा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
शिलाई गावातील ‘प्रदीप नेगी’ आणि ‘कपिल नेगी’ यांनी कुन्हाट गावच्या ‘सुनीता चव्हाण’ सोबत लग्न केला आहे. हा विवाह एकमेकांच्या सहमतीने आणि सामूहिक पद्धतीने करण्यात आला . हा विवाह ‘हाटी’ समुदायाच्या परंपरेनुसार करण्यात आला , ज्यात एकाच पत्नीला दोन किंवा अधिक भावांमध्ये शेअर केलं जातं . ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार प्रदीप नेगी हे जलशक्ती विभागात कार्यरत आहेत, आणि त्यांचा धाकटा भाऊ कपिल हा परदेशात हॉस्पिटलिटी क्षेत्रात काम करत आहे. जरी या दोघांची जीवनशैली आणि देश हे वेगवेगळे असले तरी दोन्ही भावांनी मिळून ही परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला आहे .
प्रदीप म्हणाले की हा आमचा संयुक्त निर्णय आहे. हे विश्वास काळजी आणि सामाजिक जबाबदारीचं नातं आहे . आम्ही ही परंपरा उघडपणे स्वीकारली , कारण आम्हाला आमच्या परंपरेचा अभिमान आहे.
तर मी परदेशात असलो तरी या लग्नाद्वारे आम्ही माझ्या पत्नीला स्थिरता, आदार आणि प्रेम देण्यासाठी वचनबद्ध आहे. असं कपिल नेगी यांचं म्हणणं आहे.
हा माझा स्वतःचा निर्णय होता , माझ्यावर कोणताही दबाव नव्हता , मला ही परंपरा माहित आहे. आणि मी ती माझ्या स्वीकारली असं नव्या नवरी ने सांगितलं . या अनोख्या लग्नात शेकडो गावकरी आणि नातेवाईक देखील उपस्थित होते . तीन दिवस चाललेल्या या विवाह सोहळ्यात पारंपारिक ट्रान्स गिरी पदार्थ बनवण्यात आले होते . आणि डोंगराळ लोकगीतांवर नाचणाऱ्या गावकऱ्यांनी लग्नाला उत्सवाचे रूप दिलं होतं . आमच्या गावातच तीन डझनहून अधिक कुटुंबांमध्ये दोन किंवा तीन भावांना एकच पत्नी असते , परंतु असे विवाह सहसा शांतपणे होतात, हे लग्न प्रामाणिकपणे आणि सन्मानाने सार्वजनिक रित्या साजर करण्यात आला आहे, त्यामुळे याला जगभरातून प्रसिद्धी मिळत आहे. असे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.