UNESCO 12 Forts News Marathi : महाराष्ट्राच्या १२ गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा मान ! छत्रपतींचा ऐतिहासिक ठेवा आता जगाच्या नकाशावर!

नवी दिल्ली / मुंबई : महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या 12 ऐतिहासिक गडकिल्ल्यांना युनेस्को ने ( UNESCO) जागतिक वारसा स्थळांचा ( WORLD HERITAGE SITE) दर्जा दिला आहे. ही महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी आणि विशेषता दुर्गप्रेमींसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
यामुळे आता गडकिल्ले केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे अनमोल सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा म्हणून ओळखले जाणार आहेत.
महाराष्ट्राला लाभलेल्या प्रचंड मोठ्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे हे एक मोठे यश मानले जात आहे. हे गड किल्ले केवळ दगड धोंडे आणि मातीचे अवशेष नाहीत, तर हे छत्रपतींच शिवाजी महाराज यांचं शौर्य त्याग दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या स्वप्नाचे प्रतीक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने आणि शौर्य पराक्रमाने हे गड किल्ले साकारले गेले ज्यांनी मराठा साम्राज्याच्या आणि स्वराज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावली.

कोणते आहेत हे 12 गडकिल्ले? आणि स्वराज्याच्या स्थापनेत त्यांची भूमिका काय :

रायगड :

बांधणी : मुळता या किल्ल्याचे नाव “रायरी” होते आणि ते पूर्वीपासून अस्तित्वात होते. यावर शिर्के घराण्याची सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये हा किल्ला जिंकून त्याचे नूतनीकरण केले आणि 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केले.

भूमिका : रायगड किल्ल्याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी जवळचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये रायगड राजधानी म्हणून निवडला आणि याच ठिकाणी त्यांचा राज्याभिषेक झाला हे मराठा साम्राज्याचे हृदय होतं. रायगड स्वराज्याच्या सिंहाच्या शौर्याचे साक्ष देणारं प्रतीक आहे.

राजगड :

बांधणी : हा किल्ला तेराव्या शतकात किंवा त्याहून ही पूर्वीपासून अस्तित्वात होता पूर्वी याचे नाव “मुरुंबदेव” होते. बहमनी निजामशाही आणि आदिलशाही यांच्या ताब्यातून हा किल्ला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये तो स्वराज्याच्या ताब्यात घेतला आणि त्याची नूतनीकरण करून राजगड असे नाव दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांची संबंध : छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी महाराजांनी आपल्या कारकीर्दीतील बराच काळ याच किल्ल्यावर घालवला आणि अनेक महत्त्वाचे निर्णय देखील याच किल्ल्यावरून घेतले गेले.

प्रतापगड :

बांधणी : छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये या किल्ल्याची बांधणी केली मोरोपंत पिंगळे यांनी या बांधकामाची देखरेख केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची संबंध : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला होता नोव्हेंबर 1659 रोजी.

शिवनेरी :

बांधणी : हा किल्ला यादव राजांच्या काळात म्हणजे 12 व्या शतकात बांधला गेला असं म्हणलं जात नंतर तो भामणी निजामशाही आणि आदिलशाही यांच्या ताब्यात होता.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध : 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मासाहेब जिजाऊ आणि आबासाहेब शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्म झाला.

सिंधुदुर्ग :

बांधणी : छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 या तीन वर्षाच्या काळात स्वतः या किल्ल्याची बांधणी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध : मराठा आरमाराचे महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जलदुर्ग 1664 मध्ये बांधला.

विजयदुर्ग :

बांधणी : हा किल्ला शिलाहार राजा भोज द्वितीय याने 12 व्या शतकात बांधला असं मानले जाते नंतर तो आदिलशाहीच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये तो जिंकला आणि त्याचे नूतनीकरण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध : छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचा वापर मराठा आरमारासाठी केला.

सुवर्णदुर्ग :

बांधणी : हा किल्ला शिलाहार राजवंशाने दहाव्या शतकात बांधला असं मानलं जातं नंतर तो आदिलशाहीच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 च्या दशकात तो किल्ला जिंकला आणि त्याचं नूतनीकरण केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध : महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि तो मराठा आरमारासाठी वापरला.

पन्हाळा :

बांधणी : हा किल्ला शिलाहार राजा भोज द्वितीय यांनी 1178 ते 1209 या काळात बांधला असं मानलं जातं नंतर तो देवगिरीचे यादव बहामनी आणि आदिलशाही यांच्या ताब्यात होता.

छत्रपती शिवाजी महाराजांची संबंध : छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वेळा या किल्ल्याचा वापर केला सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराज याच किल्ल्यावरून सुटले पावनखिंडीच्या मार्गाने याच पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू यांनी आपल्या स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले.

लोहगड :

बांधणी : हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेला असे मानले जाते नंतर तो बहामनी आणि निजामशाहीच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी तो अनेक वेळा जिंकला आणि गमावला पण सोळाशे सत्तर मध्ये महाराजांनी तो कायमस्वरूपी आपल्या ताब्यात घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांची या किल्ल्याचा संबंध : पुणे आणि नाशिकच्या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोणावळ्याच्या नजीक असणारा हा एक मोक्याचा डोंगरी किल्ला होता.

साल्हेर :

बांधणी : हा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे तो यादवकाळातही महत्त्वाचा होता नंतर तो बहामनी निजामशाही आणि मुघलांच्या ताब्यात होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा या किल्ल्याची संबंध : 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांसोबत साल्हेर ची लढाई जिंकली हा मराठा साम्राज्याचा मुघलांवरील सर्वात मोठा मैदानी विजय देखील मानला जातो.

खांदेरी :

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1679 मध्ये समुद्री बेटावर हा किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची या किल्ल्याचा संबंध : इंग्रजांना समुद्रातून होणारी मदत रोखण्यासाठी आणि आपल्या आरमाराचा विस्तार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता.

जिंजी :

बांधणी : हा किल्ला पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधला गेला नंतर तो नायक आदिलशाही आणि मुघलांच्या ताब्यात होता.

छत्रपती शिवाजी महाराजांची या किल्ल्याचा संबंध : छत्रपती शिवाजी महाराजांनी 1677 मध्ये दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हा किल्ला जिंकला होता हा किल्ला मराठा साम्राज्याच्या दक्षिणेकडील विस्ताराचे आणि मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला.

या सर्व गडकिल्ल्यांचे जे स्वराज्याची साक्ष देतात आणि आजही पहाडासारखे उभे आहेत या बारा गड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदणी करण्यात आली आहे हा खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे.

जागतिक वारसा स्थळ हा दर्जा मिळाल्याचं महत्त्व काय आहे :

जागतिक वारसा स्थळ या दर्जाचे महत्व मिळाल्याने या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय निधी आणि तज्ञांची मदत मिळण्यास मदत होते. तसेच यामुळे जागतिक पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध होईल. या किल्ल्यांना भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील.

पर्यटकांसाठी एक नवीन पर्वाची सुरुवात : आता महाराष्ट्रातील पर्यटक आणि जगभरातील इतिहास प्रेमींना या किल्ल्यांना भेट देण्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल हे किल्ले केवळ ऐतिहासिक स्थळे नसून ते निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि ट्रेकिंग तसेच सालसी पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण म्हणूनही ओळखले जातात. या दर्जामुळे महाराष्ट्राचे पर्यटन जगभरात उज्वल होईल आणि राज्याची सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होईल.

राज ठाकरे यांनी या संदर्भात सरकारला कोणता सल्ला दिला आहे :

राज ठाकरे यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदणी केल्याबद्दल युनिस्को चे आभार मानले आहेत. तसंच सरकारला सल्ला देखील दिला आहे.

“महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे.ही अतिशय आनंदाची बाब आहे. या 12 किल्यामध्ये 11 किल्ले महाराष्ट्र मधील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडू मधला आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठंवर पोहोचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व काय असं बोलणार्यांना कळेल. आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडू पर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृती चा सेतू संबंध कीती जुना आहे आणि मजबुत आहे हे पण कळेल”

सरकारला सल्ला : एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला की त्या वास्तूंचं संवर्धन नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात, ते पाळावे लागतात पण त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा.

आतापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरावस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हेच किल्ले दाखवावे. आपल्या महाराजांचं महाराष्ट्राचं वैभव दाखवावं, अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो.

मी आम्ही हे गेली अनेक वर्ष म्हणत आलो आहे की महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचं नीट जतन केलं आणि तिथे पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे निघून जाईल…

युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतो. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचे भान देखील बाळगावं. तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकाम आहेत ती तात्काळ पाडून टाका! जात जात धर्म पाहण्याची गरज नाही! – राज ठाकरे

जय शिवराय!