भारताची निमिशा प्रिया या नर्सला येमेनमध्ये फाशी! पण का? धक्कादायक कारण बघा…
भारताची निमिशा प्रिया या नर्सला येमेनमध्ये फाशी! पण का
नवी दिल्ली ( https://lokhitmarathi.com/ वृत्तसेवा )
भारताची नागरिक निमिषा प्रिया या केरळमधील एका सामान्य कुटुंबातील नर्स आहेत, ज्या नोकरीसाठी यमनला गेल्या होत्या,परंतु 2017 साली येमेन मध्ये येमेन नागरिक “तलाल अब्दो महेदी’ यांच्या हत्येप्रकरणी निमिषा प्रियाला दोषी ठरविण्यात आलं होतं. निमिशा च्या म्हणण्यानुसार… ‘मेहदी’ याने तिचा पासपोर्ट जप्त केला होता आणि तिला अमानुष शारीरिक व मानसिक छळ व अत्याचार करत होता यातून सुटका मिळवण्यासाठी तिने मेहदीला बेशुद्ध करणारे औषध दिले, पण औषधाचा डोस जास्त झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर तिने आणखी एक मोठी चूक केली, ती म्हणजे तिच्या एका स्थानिक सहकार्याच्या मदतीने त्या मेहदी च्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
याप्रकरणी 2018 साली येमेन च्या न्यायालयाने निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावली होती जी नोव्हेंबर 2023 मध्ये येमेन चे सर्वोच्च न्यायालय आणि त्यांची सर्वोच्च न्याय परिषद यांनी कायम ठेवली.
आणि आज पासून सहा दिवस म्हणजे 16 जुलै 2025 ला तिला फाशी देण्यात येणार आहे.
निमिषा प्रियाची आत्ताची ताजी अपडेट :
येमेन मध्ये फाशीच्या शिक्षेची टांगती तलवार असणाऱ्या केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिचा जीव वाचवण्यासाठी आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला आहे. “सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिल”ने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे, त्यामुळे निमिषाच्या सुटकेसाठी आता एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे, या याचिकेवरती 14 जुलै 2025 रोजी म्हणजे फाशीच्या 2 दिवस अगोदर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जर हस्तक्षेप केला तर निमीशाची फाशी थांबू शकते.
ब्लड मनी( Blood Money) निमिशाचा जीव वाचवू शकते :
होय येमेन च्या शर्यत कायद्यानुसार जर मृताच्या ( तलाल अब्दो मेहदीच्या ) कुटुंबीयांनी ब्लड मनी ( Blood Money ) म्हणजे’ रक्तदान’ स्वीकारण्यास सहमती दर्शवली तर मग मात्र दोषीला माफ केले जाऊ शकते. निमिशा ला वाचवण्यासाठी हाच सध्या एकमेव मार्ग आहे, सेव्ह निमीशा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिल आणि निमिषाच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत या ब्लड मनी साठी निधी गोळा करण्याचे आणि येमेन मधील पिडीत कुटुंबाशी वाटाघाटी करण्याचे अथक प्रयत्न केलेले आहेत,
भारतीय कायद्यानुसार केंद्र सरकार परदेशामध्ये ब्लड मनी थेट देऊ शकत नाही मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने केंद्र सरकारला निमिषाचा जीव वाचवण्यासाठी मत्सुदी मार्ग वापरण्याचे आणि ब्लड मनीच्या वाटाघाटींसाठी सुविधा पुरवण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे.
ही याचिका स्वीकारल्याने भारताची परराष्ट्र नीती निमिषाच्या मदतीला धावून येईल अशी आशा पल्लवीत झाली आहे.
निमिषाचा जीव वाचवण्यासाठी कुटुंबाने भारत देशातील नागरिकांना मागितली मदत.
निमिषाचे वृद्ध आई-वडील आणि तिची मुलगी तिच्या सुटकेसाठी प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावत आहे. https://lokhitmarathi.com/ शी बोलताना त्यांनी सरकारला आणि देशातील नागरिकांना मदतीसाठी विनंती केली आहे, निमिषाच्या सुटकेसाठी, भारतातील नागरिकांनी भावनिक आधार देण्याची विनंती केली आहे.
भारतातून मोठ्या प्रमाणामध्ये भावनिक आणि नैतिक पाठिंबा मिळत आहे अनेक संघटना आणि नागरिक तिच्यासाठी निधी निधी गोळा करत आहेत.
आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी 14 जुलैला होणार आहे त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि त्यानंतर केंद्र सरकारची भूमिका निमिषा प्रियाच्या जीवनासाठी अत्यंत निर्णयक ठरणार आहे ,
येमेन मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी भारत सरकार काय पाऊल उचलत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक अपडेट साठी आणि माहितीसाठी https://lokhitmarathi.com/ ला भेट देत रहा.