Honey Trap News Maharashtra : हनी ट्रॅप ची चर्चा सुरू असलेली महिला, करुणा मुंडें सोबत थेट कॅमेरासमोर ; दोन एसीपी चे फोटो दाखवत धक्कादायक केले आरोप.
“BJP-linked Prafull Lodha arrested in a massive honey trap case involving minors and political links. Nana Patole claims pen drive evidence. Full story here
लेखक | लोकहित मराठी टीम | 22 जुलै 2025
राज्यात हनी ट्रॅप ची चर्चा जोरदार रंग धरू लागली असतानाच, ज्या महिलेचा वारंवार उल्लेख केला जात होता, ती महिलाच “करुणा मुंडे” यांच्यासोबत थेट कॅमेरासमोर आल्याने अनेकांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. एका होमगार्ड असलेल्या महिलेने दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप देखील केला आहे, करुणा मुंडे यांनी पीडित महिलेला सोबत घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे, तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकून उलट पीडित महिलेवरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे त्या महिलेने आत्महत्याचा इशारा देखील दिला आहे,
हनी ट्रॅप म्हणजे काय?
हनी ट्रॅप म्हणजे हे गुप्तचर यंत्रणांनी वापरलेलं तंत्र आहे, ज्यात व्यक्तीला रोमँटिक किंवा लैंगिक आकर्षणाद्वारे फसवून त्या व्यक्तीपासून त्यांच्याकडे असणारी गुपित माहिती घेऊन राजकीय हेतूने नंतर खंडणी देखील मागितली जाऊ शकते.
सध्या राज्यात नाशिक मधील हनी ट्रॅप प्रकरण जोरदार सुरू आहे अशातच ठाण्यातील एका होमगार्ड असलेल्या महिलेने प्रसार माध्यमांसमोर येत दोन वरिष्ठ एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. करुणा मुंडे यांनी महिलेला कॅमेरा समोर आणत हा कसलाही हनी ट्रॅप नसून, सदर महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप केले आहेत. होमगार्ड असलेल्या महिलेवर दोन एसीपींनी लैंगिक अत्याचार केला, तिने तक्रार दाखल करू नये म्हणून पोलिसांनी तिच्यावरच उलट खंडणीचा गुन्हा दाखल केला. तसेच तिच्या तरुण मुलींना ही त्रास देण्याचं काम या एसीपींकडून सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला न्याय मिळवण्यासाठी फिरत आहे. मात्र तिची कोणीही दखल घेत नाही, कारण या प्रकरणातील आरोपी एसीपी असल्यामुळे कोणीही महिलेची मदत करायला पुढे येत नाही असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पीडित महिलेने पत्रकार परिषदेत ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो दाखवत आरोप केला की, ठाण्यातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने जिम परिसरात माझ्याशी ओळख केली, “मी तुम्हाला ओळखतो असं सांगून त्याने माझा मोबाईल नंबर घेतला” त्यानंतर तो मला सातत्याने मोबाईलवर चांगले चांगले मेसेज करत होता, एक दिवस त्याने मलाही त्याच्या घरी चहा प्यायला बोलावलं, तसं तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला यावं अशी माझ्या बायकोची इच्छा असल्यास सांगितले, आणि माझं एका महिलेसोबत फोनवर बोलणं देखील करून दिलं, त्याची बायको आपल्याशी फोनवर बोलली आहे, असं समजून मी त्याच्या घरी चहा प्यायला गेले. पण तिथे गेल्यावर त्याने मला पाण्यातून गुंगीचा औषध दिलं आणि त्याने माझ्यासोबत त्याच्यासोबत असलेले एक आणखी पोलिसांनी असं दोघांनी मिळून माझ्यावर लैंगिक अत्याचार केले, असा सणसणाटी आरोप या पीडित महिलेने केला आहे.
प्रफुल लोढा कोण आहे त्याला अटक का झाले?
भाजपचा नेता जळगावचा प्रफुल लोढा याच हनी ट्रॅप मध्ये सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. जळगाव जिल्ह्यातला पहूर या गावचा प्रफुल लोढा त्याचे वय 62 आहे हे नाव सध्या महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय बनला आहे. नोकरीचा अमीश दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणे, महिलांना ब्लॅकमेल करणे,आणि संपूर्ण हनी ट्रॅप रॅकेट चालवण्याचा गंभीर आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आला आहे. याला मुंबई पोलिसांनी अंधेरी पूर्व येथून अटक केली असून या प्रकरणामुळे राज्यात मोठा गदारोळ माजला आहे.
प्रफुल लोढा हा भाजपचे संकट मोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश महाजन यांचा अत्यंत जवळचा निकट संबंध असलेला कार्यकर्ता आहे.
प्रफुल लोढा वर 16 वर्षाच्या दोन मुलींवरती नोकरीच अमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप आहे. याचबरोबर त्या मुलींचे अश्लील फोटो काढून वारंवार लैंगिक अत्याचारासाठी धमकावल्याचा देखील आरोप ठेवण्यात आला आहे. एका प्रौढ महिलेलाही नोकरीच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा बळी करण्यासाठी ठेवण्यात आला आहे.
पिडीत महिला : माझं जीवन संपवणार आहे पीडित व्यक्तीचा जीवन संपवण्याचा इशारा!
मला शुद्ध आल्यानंतर मी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले पण, माझी तक्रार घेतली नाही. त्यानंतर मी डीसीपी, सीपी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून माझ्यासोबत झालेला प्रकार सांगितला पण, कोणीही दखल घेत नाही. माझं राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगणं आहे की, पुढील आठ दिवसात जर तुम्ही दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर मी माझा आयुष्य संपवणार आहे असा इशाराही सदर महिलेने दिला आहे.
“दरम्यान होमगार्ड असलेल्या महिलेवर जर अत्याचार होत असेल तर, महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांच्या सुरक्षेचं काय? महाराष्ट्रात शासन प्रशासन कुठे आहे महिलांच्या सुरक्षबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शासकीय अधिकारी आणि माजी मंत्री मन भरून हनिमून करत आहेत. मात्र मन भरल्यानंतर त्यांना तेच हनी हे हनी ट्रॅप वाटत आहे असा हल्लाबोल करुणा मुंडे यांनी केला आहे.