Nishikant Dube on Raj Thackeray and Uddhav Thackeray: मराठी माणसं दहशतवादी
Nishikant Dube on Raj Thackeray and Uddhav Thakre :
दहशतवादी लोकांनी हिंदूंवर अत्याचार केले हे हिंदीवरून अत्याचार करतात भाजपचा खासदार निशिकांत दुबे बरळला
AMOL KOLEKAR ; गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये “मराठी आणि हिंदी” हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरत आहे, महाराष्ट्रामध्ये पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्ती केल्यानंतर, महाराष्ट्रातील मराठी माणूस राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला धारेवर धरून हिंदीचा जीआर रद्द करायला लावला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी हा वाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून त्यातच आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उडी घेतली आणि त्यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि मराठी आंदोलक यांना थेट दहशतवादाची तुलना करत टीका केली.
निशिकांत दुबेची टीका: मराठी आंदोलक सलाऊद्दीन, मसूद अजहर, दाऊदसारखे आहेत. दहशतवाद्यांनी हिंदू वर अत्याचार केले, हे हिंदीवरून अत्याचार करतायेत अशी जळजळती टीका भाजपचा खासदार निशिकांत दुबे याने राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि मराठी आंदोलकांवर केली,
हिम्मत असेल तर उर्दू भाषकांना मारून दाखवा आपल्या घरात कोणी पण कुत्रा सिंह असतो आता यामध्ये कुत्रा कोण आहे आणि सिंह कोण आहे हे तुम्हीच ठरवा ,असं हे निशिकांत दुबे बरळला.
याबरोबरच खरच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची वारसदार असाल तर तुमच्या शेजारीच असलेलं माहीम दर्गा या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना मारून दाखवावं असं खुला आव्हान देखील निशिकांत दुबेनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना दिलं
आमच्या पैशावर जगतायत , सगळे उद्योग गुजरात मध्ये येत आहेत , हिम्मत असेल तर तुम्ही तेलगु लोकांना पण मारा असंही निशिकांत दुबे बरळला
या वक्तव्यांवरती आता मनसे शिवसेना आणि मराठी आंदोलक आक्रमक होऊ शकतात.
देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेला दिली मोठी धमकी :
त्रिभाषासुत्रावरून देवेंद्र फडणवीस यांनी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा जो काही घाट घातला त्या विरोधामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले , ठाकरे बंधूंचा मेळावा पाच जुलैला झाला परंतु त्या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणामध्ये मराठी समाज हा जमा झाला होता .
त्यामध्ये पाठीमागच्या काही दिवसांमध्ये मीरा-भाईंदर मध्ये एका राजस्थानी दुकानदाराला शाब्दिक बाचाबाची मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी कानाखाली मारली होती , त्यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला “धमकी वजा इशारा” दिलेले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले , भाषेवरून मारहाण करणं हे अतिशय चुकीच आहे आम्ही मराठी आहोत आम्हालाही मराठीचा अभिमान आहे! पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करण हे पूर्णपणे चुकीचा आहे, उद्या आपली अनेक लोक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यात व्यवसाय करतात त्यामधील आपल्या अनेक माणसांना तेथील भाषा येत नाही , मग त्यांना पण अशाच प्रकारे वागणूक मिळाली तर … भारतामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी योग्य नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्याचबरोबर अशी गुंडगिरी करणाऱ्याला कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांवरती कारवाई करू असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे यांच्या कडून कार्यकर्त्यांना पुन्हा एक सुचक इशारा : वरळी डोम या ठिकाणी ठाकरे मेळावा पार पडला या ठाकरे मेळाव्यासाठी महाराष्ट्रभरातून मराठी प्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवली याच ठाकरे मेळाव्यामध्ये भाषण करत असताना राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना एक इशारा देखील दिलाय .
राज ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले महाराष्ट्रामध्ये उठ सूट कुणालाही मारायचं नाही,
पण जर का कोणी नाटक केली तर त्याच्या कानाखाली आवाजच आला पाहिजे .
महाराष्ट्रात हिंदीवाद सुरू असताना त्यातच राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारची सूचना देणे यावरून राज्याचे राजकारणात तापू शकतो.
गांडूची अवलाद समजू नये – राज ठाकरे
वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये भाषण करताना राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक आणि ठाकरे शैलीमध्ये महाराष्ट्रातील त्यांच्या विरोधकांना एक प्रकारची धमकी वजा इशारा दिला आहे , महाराष्ट्रामध्ये हिंदी जर सक्ती करणार असेल त्या विरोधामध्ये मराठी माणूस हा शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाही.