NCP president Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड, शरद पवारांनी केली घोषणा
✍️लेखक | लोकहित मराठी | टीम 15 जुलै 2025
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील पक्ष संघटनेत मोठा बदल केला आहे. श्री शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे ,यापूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष होते , शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.
कोण आहेत शशिकांत शिंदे?
शशिकांत शिंदे यांचा जन्म 19 ऑक्टोबर 63 रोजी कोरेगाव येथील खामगाव या गावी झाला, सुरुवातीपासूनच आक्रमक असणारे शशिकांत शिंदे लवकरच माथाडी कामगारांच्या प्रश्नांमुळे माथाडी कामगारांमध्ये ते लोकप्रसिद्ध झाले, आणि त्यातून राजकारणाकडे वळले.
शशिकांत शिंदे यांनी 1999 साली त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली आणि ते सातारा जिल्ह्यातील जावळी मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिल्याने पहिल्याच प्रयत्नात ते आमदार म्हणून निवडून ये आले .
2004 च्या विधानसभा निवडणुकीत देखील जावळी विधानसभा जिंकून त्यांनी पक्ष वाढीसाठी सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं.
2009 साली त्यांनी जावळी विधानसभा मतदारसंघ सोडल्यानंतर कोरेगाव मतदार संघात आपलं वजन वाढवायचं ठरवलं आणि कोरेगाव मतदारसंघाच्या आमदार शालिनी पाटील यांचा धुवा उडवत त्यांनी हॅट्रिक केली आणि ते कोरेगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतर त्यांना जायंट किलर म्हणून देखील ओळखले जाऊ लागले.
2014 साली तब्बल 96 हजार मतांनी ते कोरेगाव मतदारसंघातून निवडून आले आणि मोदी लाटेतही त्यांनी आपली बाजू सांभाळली.
2019 साली शशिकांत शिंदे यांचा पराभव महेश शिंदे यांनी अवघ्या 6200 मतांनी केला आणि शशिकांत शिंदे यांना पहिल्यांदा पराभव पत्करावी लागली.
त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये परंतु उदयनराजे भोसले यांच्याकडून देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
2020 साली दोन्ही राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार यांना साथ दिली आणि त्यानंतर त्यांची विधानपरिषदेवरती विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवड झाली.
2024 साली पुन्हा कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव करत त्यांना पराभवाची धूळ चारली
पुन्हा विधान परिषदेचे आमदार म्हणून राष्ट्रवादीने त्यांची नियुक्ती केली.
शशिकांत शिंदे यांचा संघटनात्मक अनुभव
2019 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व प्रांतीय उपाध्यक्ष म्हणून ते कार्य करत होते
नवी मुंबईसाठी डिस्ट्रिक्ट इन्चार्ज म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं.
2020 नंतर विधान परिषदेचे प्रमुख सचिव म्हणून देखील त्यांच्या पक्षाची बाजू मांडली.
शशिकांत शिंदे यांचा राजकीय प्रवास साजरी लोकसभेतून राज कारणात झाला असला तरी त्यांनी आत्तापर्यंत विधानसभा लोकसभा या लढवल्या आहेत त्यांनी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे, आणि आता ते संघटनात्मक पातळीवर ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.
राजकीय यश अपयश देखील फार रंजक राहिलेला आहे त्यांनी चार वेळा विधानसभा निवडणूक लगातार जिंकले आहेत ते मंत्री राहिले आहेत पण त्यानंतर त्यांनी तीन विधानसभा निवडणूक लढल्या पण तिन्हीही विधानसभेमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्यांनी एक लोकसभा निवडणूक देखील लढवली त्यातही त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेवर आमदार आहेत.
प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची अग्निपरीक्षा
2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहेत हे गट शरद पवार आणि दुसरा गट अजित पवार असे झाले आहेत
कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार यांच्यामध्ये अजूनही हाच गोंधळ आहे की खरा पक्ष कोणता आहे त्यामध्ये शशिकांत शिंदे यांना मोठ्या प्रमाणामध्ये काम करावे लागेल
शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून पक्षाची बांधणी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कार्य करावे लागेल
पक्षाची विश्वासार्हता जी गट पडल्यामुळे कमी झाली आहे मतदारांमध्ये ती विश्वासारिता पुन्हा एकदा मिळवावी लागेल.