Attack On Pravin Gaikwad Sambhaji Brigade : माझ्या हत्येचा कट होता; पण ही शेवटची सुरुवात’ शाईफेकीनंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती सोलापूर येथे शाहीफेक करण्यात आली ज्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे . प्रवीण गायकवाड यांनी या हल्ल्यासाठी थेट सरकारला जबाबदार धरले असून हा त्यांच्या हप्तेचा कट असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे पुरोगामी विचारधारेचे कार्यकर्ते असुरक्षित असल्याची भावना त्यांनी यावेळेला व्यक्त केली. तसेच या हल्ल्यामागे षडयंत्र असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर : सोलापूर येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती आज शाही फेक घटना घडली या घटनेनंतर प्रवीण गायकवाड आक्रमक होत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकारवर आरोप देखील केले आपल्यावरील हल्ल्याच्या घटनेला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे असे प्रवीण गायकवाड म्हणाले ; तसेच आपल्या हत्येचा कट होता आणि ‘ही शेवटची सुरुवात आहे’ असं देखील प्रवीण गायकवाड या वेळेला म्हणाले.
‘मी अक्कलकोटला गेलो होतो अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळा वंगण तेल टाकलं त्यांनी माझ्यावर हल्ला केला, त्यांनी मला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. ही गोष्ट खरी आहे पण ही विचारधारा जी आहे तुम्हाला आठवत असेल डॉक्टर पानसरे यांचा खून झाला, डॉक्टर कुलबर्गे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, यांचा खून झाला डॉक्टर गौरी लंकेश चा खून झाला या सत्ता काळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत असं प्रवीण गायकवाड म्हणाले.

प्रवीण गायकवाड यांचे सूचक विधान “ही शेवटची सुरुवात”

कधीकधी पक्ष फोडले जातात पक्षा नंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यांच्यासारखी कुठली गोष्ट करता नाही आली, आम्ही एक सत्य विचारसरणीचं काम करतो आमचा विचार हा राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे, या देशात मानवता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम सुरू आहे आणि ते सुरूच राहणार, पण दुर्दैवाने अशा सामाजिक संघटनांबाबत काही गैरसमज पसरवले जातात मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतात, असंही संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले.

‘मी या घटनेचा निषेध करणार नाही’ पण एक निश्चित सांगतो ‘ही शेवटची सुरुवात आहे’ संभाजी ब्रिगेड चा इतिहास सर्वांना माहीत आहे ‘संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची स्टाईल सगळ्यांना माहित आहे’ राज्यकर्त्यांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत मी कार्यक्रमात पोहोचलो त्यावेळेला कोणत्याही प्रकारची पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना दिली आहे.

माझ्या हत्येचाच कट होता :

अशा वेळेस मला वाटते की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथे नव्हती का काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का? माझ्या जीवविताला धोका होता का? माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे मी आज जिवंत आहे, मला आनंद वाटतो की या पुढच्या काळात काहीतरी चांगलं काम करायचं असल्यामुळे हे नवीन जीवन मला मिळालं असा दावा देखील प्रवीण गायकवाड यांनी केला.

माझ्या हप्तेचा कट होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झाला आहे माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ‘संभाजी भोसले’ असतील त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर हल्ला झाला होता त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे असे प्रवीण गायकवाड स्पष्ट म्हणाले.